spot_img
spot_img

तिरुपतीत ‘बुलढाणा अर्बन’चा डंका! -भाविकांना सुविधा पुरविण्यात ‘बुलढाणा अर्बन भक्त निवास’ एक नंबर वर! – माफक दरात पोटभर जेवण!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) दक्षिण भारतातील सर्व मंदिर आपल्या भव्यता आणि सुंदरतेमुळे प्रसिद्ध आहेत, परंतु तिरुपती बालाजीचे मंदिर सर्वात जास्त लोकप्रिय आहे.येथे दररोज लाखो-कोटींचे दान केले जाते. परंतु तिरुपती येथे श्री. राधेश्याम चांडक यांच्या बुलढाणा अर्बन भक्ती निवासाची बातच न्यारी आहे. हे भक्ती निवास कमी खर्चात जास्त सोयी सुविधा भक्तांना पुरवते. जेवण तर अगदी माफक दरात असून, जेवनाचा स्वादही कमालीचा असल्याच्या प्रतिक्रिया ‘हॅलो बुलढाणा’ ला अनेक भक्तांनी दिल्या आहेत.

भारतात अशी अनेक मंदिरे आहेत ज्या मंदिरांना दरवर्षी भाविक मोठ्या प्रमाणात देणगी देत असतात. त्यापैकी एक म्हणजे तिरुपती बालाजीचे मंदिर आंध्रप्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात आहे. या मंदिराला भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर मानले जाते, कारण येथे दररोज लाखो-कोटींचे दान केले जाते. येथेच बुलढाणा अर्बन बँकेचे सर्वेसर्वा भाईजी यांनी देश विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी भव्य भक्ती निवास उभारले आहे.

तिरुपती बालाजीला कधी भविष्यात दर्शनाला गेले तर आधी बुलढाणा अर्बन भक्ती निवास गाठायला हवा. या भक्ती निवासात भाविकांना योग्य आणि तत्पर सोयी सुविधा उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे जेवण अगदी माफक दरात असून जेवणाला घरगुती चव आहे. दोन भाज्या, वरण- भात, चपाती, हिरव्या मिरचीचा ठेचा,पापड,दही असा जेवनाचा देत असतो.आणि तेही फक्त 150 रुपयांमध्ये
अनलिमिटेड ! त्यामुळे बुलढाण्यातील किंवा महाराष्ट्रातील भाविकांनी एकदा बुलढाणा अर्बनच्या भक्ती निवासाला भेट द्यावी आणि येथील जेवणाचा आस्वाद घ्यावा, असे जेवण आवडलेल्या भाविकांनी ‘हॅलो बुलढाणा’ शी बोलताना सांगितले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!