spot_img
spot_img

BIG BREAKING! “फोनवरून धमक्या देणार नाही; डोकं फिरलं तर पाचव्या मजल्यावरून कार्यक्रम करून टाकीन!” आ. संजय गायकवाडांचा भरसभेत आक्रमक इशारा “अभी तो बच्चा उतरा है, बाप की एन्ट्री बाकी है सेठ!”; नाव न घेता आ. महाले दाम्पत्यावर तोफ – “RSSलाही किंमत नाही?अन् कार्यक्रमात ओरिजनल भाजपही”…..

धाड (हॅलो बुलढाणा)मी केबिनमध्ये बसून फोनवरून धमक्या देणारा नाही. गरज पडली आणि माझं डोकं खराब झालं, तर पाचव्या मजल्यावरून येऊन कार्यक्रम करून टाकीन. त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांना धमक्या देण्याच्या भानगडीत पडू नका,” असा अत्यंत आक्रमक इशारा बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी भरसभेत दिला. नावघेता त्यांनी चिखलीच्या आमदार श्वेता महाले आणि मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव विद्याधर महाले यांच्यावर आरोपांची तोफ डागली.

“अभी तक तो मेरा बच्चा ही उतरा है,अभी तो बाप की एन्ट्री बाकी है सेठ!” असे म्हणत गायकवाड यांनी आगामी राजकीय संघर्षाचे थेट संकेत दिले.गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून आपण कर्नाटकमध्ये होतो. बुलढाण्यात झालेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाशी आपला कोणताही संबंध नव्हता धाड येथील दहीहंडीच्या आयोजनाशी संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. “सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम उभा केला. आम्हाला भाड्याने माणसं आणण्याची गरज नाही. लोकांच्या काळजात आम्ही स्थान निर्माण केले असून ३०-३५ वर्षांपासून आमच्यासोबत कार्यकर्ते उभे आहेत,” असे ते म्हणाले.यांना वाढदिवसासाठी लोकांना ५०० ते ८०० रुपये देऊन आणल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. “शिपायापासून अधिकाऱ्यांपर्यंत फोन करून, गावागावातील लोकांना ‘मला शुभेच्छा द्यायला या’ असे सांगण्यात आले. असा वाढदिवस कुणी पाहिला आहे का? शुभेच्छा मनापासून मिळण्यासाठी आधी काम करावे लागते,” असा टोला त्यांनी लगावला.
सहकार विद्या मंदिरात आठ हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली; मात्र प्रत्यक्षात दोन हजार लोकही जेवले नाहीत, असा दावाही आमदार गायकवाड यांनी केला. “बुलढाणेकरांनी त्या कार्यक्रमाकडे ढुंकूनही पाहिले नाही.शेतकरी संकटात असताना वाढदिवसावर दोन-चार कोटी रुपये खर्च करणे योग्य आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

“मला विरोध करायचा असता, तर धाड नाक्यावर माझी फौज उभी केली असती; मग हे मागच्या मागे गायब झाले असते,” असेही ते म्हणाले. भाषणादरम्यान त्यांनी काँग्रेसमधील एका कार्यकर्त्यांविषयी आक्षेपार्ह शब्दप्रयोग करत त्यांच्यावरही निशाणा साधला.

“मी महाराष्ट्रातील दमदार आमदार आहे. मतदारसंघात सात हजार कोटी रुपयांची विकासकामे आणली, गोरगरिबांना घरे दिली आणि विधवांना मदत मिळवून दिली. तुमच्याकडे मुख्यमंत्री आहेत, तर त्या ताकदीचा उपयोग धाड आणि चिखलीच्या विकासासाठी करा. आमच्याशी स्पर्धा करण्यापेक्षा रोजगार,उद्योग आणि शेतकऱ्यांच्या मुलांच्या हाताला काम द्या,” असे आव्हान गायकवाड यांनी दिले.

फोटो,स्टेटस किंवा बॅनर लावल्यामुळे गरीब तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका, असे आवाहन करत त्यांनी रिजवान सौदागर,निलेश आणि मनोज यांचा उल्लेख केला. “आता तुम्ही काळजी करू नका; मी देखील आमदार आहे. युवकांच्या या प्रचंड शक्तीला आव्हान देऊ नका, अन्यथा त्यांच्या ताकदीसमोर तुमचा पालापाचोळा होईल,” असा घणाघात गायकवाड यांनी केला

‘कार्यक्रमात ओरिजनल भाजप नव्हती; RSSलाही किंमत नाही!’

बुलढाण्यातील वाढदिवसाच्या कार्यक्रमावर टीका करताना आ. संजय गायकवाड यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबतही भाष्य केले. “या कार्यक्रमात आरएसएसलाही कोणती किंमत देण्यात आली नाही. बुलढाण्यातील ओरिजनल भाजप कार्यक्रमात नव्हती आणि चिखलीतील मूळ भाजप कार्यकर्तेही त्यांच्यासोबत नाहीत. बुलढाण्यातील काही उपऱ्यांना घेऊन हा कार्यक्रम करण्यात आला,” असा दावा गायकवाड यांनी केला.

दरम्यान, या आरोपांबाबत महाले दाम्पत्यांची  प्रतिक्रिया समोर आलेली नाही.त्यांची भूमिका मिळाल्यानंतर तीही प्रसिद्ध केली जाईल.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!