spot_img
spot_img

धाडमध्ये संजुभाऊंचा ‘महापॉवर शो’! फुलांचा पाऊस अन् विरोधकांवर गर्जना – “बाप कोण, येणारा काळच दाखवेल!” हजारोंच्या जनसागरात दहीहंडीचा महासंग्राम; “माझ्या कार्यकर्त्याला हात लावाल तर गाठ माझ्याशी!” म्हणत आ. संजय गायकवाडांचा सडेतोड इशारा!

धाड (हॅलो बुलढाणा) नगरीत धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज मित्र मंडळाच्या दहीहंडी उत्सवाने अक्षरशः राजकीय रंग भरला! आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड आणि युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्या भव्य रोडशोने शहर दणाणून गेले. रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या हजारो नागरिकांनी घोषणांचा गजर केला; तर जेसीबीच्या साह्याने पुष्पवृष्टी करत संजुभाऊंचे जंगी स्वागत करण्यात आले. नागरिक व माता-भगिनींनी ठिकठिकाणी शाल-श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला.

भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दहीहंडी उत्सवाला प्रारंभ झाला. ढोल-ताशांचा कडकडाट, गोविंदांच्या घोषणा आणि तरुणाईच्या उत्साहाने संपूर्ण धाड नगरी जल्लोषात न्हाऊन निघाली. खानदेश किंग तथा मराठी बिग बॉस फेम सचिन कुमावत, रुचिता जमादार आणि पूजा राठोड यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली.

मात्र, खरा राजकीय ‘धमाका’ संजुभाऊंच्या भाषणातून झाला! “बाप तो बाप रहेगा… हे येणारा काळ दाखवेल!” असे ठणकावत त्यांनी विरोधकांना थेट आव्हान दिले. “माझ्या कोणत्याही जीवाभावाच्या कार्यकर्त्याला हात लावायचा नाही; त्यांच्या नादी लागाल तर गाठ माझ्याशी आहे,” असा सज्जड इशाराही त्यांनी दिला.

राजकीय ताकदीचे प्रदर्शन करणाऱ्यांवर निशाणा साधत संजुभाऊ म्हणाले, “एका लेकराला ताकद दाखवण्यापेक्षा ती जनतेसाठी दाखवा! तरुणांच्या हाताला रोजगार द्या, एमआयडीसी आणा आणि तुमच्या पॉवरचा फायदा गोरगरीब जनतेला करून द्या.”

नगराध्यक्ष पूजाताई गायकवाड, पृथ्वीराज गायकवाड, संतोष उबाळे, ओमसिंग राजपूत यांच्यासह शिवसेना-युवासेनेचे पदाधिकारी आणि हजारो नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन उपजिल्हाप्रमुख निलेश गुजर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.धार्मिक जल्लोषासोबतच संजुभाऊंच्या आक्रमक गर्जनेने धाडच्या व्यासपीठावरून आगामी राजकीय संघर्षाची झलक दाखवली!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!