spot_img
spot_img

बुलढाण्यात १२ सप्टेंबरला ‘बुद्ध रश्मी महाविहार’चा शिलान्यास सोहळा..! भादोला येथे भूमिपूजन, शिलान्यासासह विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल! भूमिपूजनापासून बुद्धारोपण, पुण्यानुमोदना आणि उपासक भोजनापर्यंत कार्यक्रमांची रेलचेल..!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहरातील भादोला परिसरात ‘बुद्ध रश्मी महाविहार, बुलढाणा’ या महत्त्वाकांक्षी धार्मिकसामाजिक उपक्रमाचा शिलान्यास सोहळा येत्या १२ सप्टेंबर २०२६, शनिवार रोजी आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी सर्व नागरिकांना सादर आमंत्रित करण्यात आले असून, विविध धार्मिक विधी आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता भूमिपूजनाने होणार आहे. त्यानंतर १० वाजून १५ मिनिटांनी शिलान्यास, तर सकाळी ११ वाजता महासंघ दान होणार आहे. दुपारी १ वाजता परित्राण पाठ, त्यानंतर २ वाजता बुद्धारोपण आणि २ वाजून ४५ मिनिटांनी पुण्यानुमोदना कार्यक्रम होईल. दुपारी ३ वाजता उपासक भोजनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या शिलान्यास सोहळ्यास परम पूज्य गुरु भन्ते जी तसेच विविध भिक्षु संघातील उदित ज्ञान भन्ते, ज्ञान रक्षित भन्ते, मैत्राजी भन्ते, विवेक भन्ते, शांतीवित भन्ते, यश भन्ते, धम्ममित्र भन्ते यांच्यासह आदरणीय भिक्षु संघाची उपस्थिती राहणार असल्याचे निमंत्रण पत्रिकेत नमूद करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे संयोजक म्हणून भन्ते यश यांचा उल्लेख करण्यात आला असून, अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांकही देण्यात आले आहेत. तसेच महाविहाराच्या उभारणीसाठी दान-सहयोगाचे आवाहन करण्यात आले असून, त्यासाठी क्यूआर कोडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भगवान बुद्धांच्या विचारांचा प्रसार, धम्मचळवळीला बळकटी आणि समाजात शांतता, समता व बंधुभावाचा संदेश पोहोचविण्याच्या दृष्टीने या महाविहाराचा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. भादोला, बुलढाणा येथे होणाऱ्या या शिलान्यास सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!