बुलढाणा (हॅलो बुलढाणा) स्वयंस्फुर्तीने मित्र परिवाराने काढलेली श्री विद्याधर महाले यांची वाढदिवस रॅली आणि रॅलीत उसळलेला जनसागर पाहता, आ.श्वेता महाले यांच्या नावाची बुलढाण्यात लाट आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.दरम्यान दुसऱ्यादिवशी आ.श्वेता महाले यांनी बुलढाण्यात हजेरी लावत नागरीकांशी संवाद साधला व स्वच्छतेबाबत पालिकेला सुचित केले तर ‘चाय पे चर्चा’ ही रंगल्याने आ. महालेंच्या लोकप्रियतेची प्रचिती दिसून आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचीव श्री विद्याधर महाले यांची बुलढाण्यात निघालेली अभिष्टचिंतन रॅली अभूतपूर्व ठरली. बुलढाणकरांनी स्वतःहून सहभाग घेतला व उत्स्फूर्तपणे स्वागत केले. विशेष म्हणजे आपलेपणाची भावना व्यक्त करत काही नागरिकांनी स्वतःहून चहा, नाश्ता व पाण्याचे मोफत वाटप केले. या सेवाभावी व्यवस्थेने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते. काही ऑटोचालकांनी सभास्थळी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना स्वयंस्फूर्तीने मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली. मोठ्या राजकीय कार्यक्रमांमध्ये आयोजकांकडून व्यवस्था केली जाते; मात्र येथे नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेतला.
या उत्स्फूर्त प्रतिसादाची दखल घेत आम.श्वेता महाले यांनी आज बुलढाणा शहराला भेट दिली. कालच्या कार्यक्रमानंतर शहरातील नागरिकांनी व्यक्त केलेले प्रेम आणि आपुलकी पाहून त्यांनी विविध ठिकाणी नागरिक, व्यापारी, कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच पत्रकार बांधवांच्या भेटी घेत संवाद साधला. नागरिकांशी अनौपचारिक चर्चा करताना रॅली कार्यक्रमातील अनुभव, शहरातील प्रश्न आणि पुढील विकासकामां
बाबतही त्यांनी चर्चा केली.
दरम्यान, रॅलीनंतर निर्माण झालेल्या कचऱ्याची स्वच्छता तातडीने करण्यात यावी, यासाठी आम. महाले यांनी सकाळीच बुलढाणा नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्याशी चर्चा करून आवश्यक सूचना दिल्या.
सायंकाळी बुलढाणा येथे प्रत्यक्ष भेट देऊन त्यांनी स्वच्छता व्यवस्थेची पाहणी केली आणि मुख्याधिकाऱ्यांशी पुन्हा चर्चा केली. त्यामुळे भव्य राजकीय शक्तिप्रदर्शनानंतर शहराच्या व्यवस्थेची जबाबदारीही तितक्याच गांभीर्याने घेतल्याचा संदेश यातून देण्यात आला.
▪️’चाय पे चर्चा’ रंगली!
आ. श्वेता महाले यांनी कारंजा चौक येथील प्रसिद्ध हॉटेल ‘श्रीराम’ येथे नागरिकांसोबत ‘चाय पे चर्चा’ केली. संगम चौकातील ‘येवले अमृततुल्य’ येथेही भेट देत त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.
मोठ्या राजकीय कार्यक्रमानंतर दुसऱ्याच दिवशी रस्त्यावर उतरून नागरिकांमध्ये मिसळण्याची त्यांची भूमिका चर्चेचा विषय ठरली. यावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.













Total Users : 3386526