spot_img
spot_img

बुलढाण्यात मोहंमद पैगंबर साहेबांचा ईद-ए-मिलाद हर्षोल्हासात!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) पैगंबर हजरत मोहम्मद साहेब यांच्या १५०१ व्या जयंतीनिमित्त संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासह देशभरात ईद मिलादुन्नबी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली.

परंपरेनुसार, शहरालगतच्या इंदिरा नगर मदीना मशिदीपासून सकाळी ९ वाजता जुलुस ए मोहम्मदी मिरवणूक सुरू झाली. अर्ध्या तासानंतर जुनागावहून आणखी एक मिरवणूक इंदिरा नगरच्या मिरवणुकीत सामील झाली. त्यानंतर मिरवणूक इक्बाल नगरकडे वळली आणि त्यानंतर सकाळी १० वाजता इकबाल चौकातून मुख्य मिरवणूक सुरू झाली. जुलुस ए मोहम्मदीची मिरवणूक शहरातील इक़बाल चौक, उस्मान डोंगरे चौक, ख्वाजा मियाँ चौक, टिपु सुलतान चौक, मदीना मशीद, सराफा लाईन, जयस्तंभ चौक मार्गे जुना गावातील ईदगाह येथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली. यावेळी समाजातील लोकांनी शांती, आनंद आणि
शांतीसाठी प्रार्थना केली. त्यानंतर त्यांनी एकमेकांना मिलादुन्नबीच्या शुभेच्छा दिल्या. शोभा यात्रेत तरुण, पुरुष आणि लहान मुले सहभागी झाले, मिरवणुकीत घोडे,अमन रथांसह भक्तिगित गायन करतांना समाज बांधव
दिसून आले. जामा मशीदचे इमाम कारी कलीम खान रज़वी, मदीना मशीदचे इमाम मीर वसीम रजा, इंदिरा नगर येथील मौलाना वाजिद साहेब, हफ़िज़ सय्यद नदीम, मौलाना इरशाद साहब, मौलाना फहीम साहब, हफ़िज़ सलमान रजा यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मिरवणुक काढण्यात आली.

▪️अल मदिना फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम!

गत तीन वर्षापासून अल मदिना फाउंडेशनसह यावर्षी जामा मस्जिद ट्रस्ट आणि जमात रजा ए मुस्तफा तर्फे पैगंबर मोहम्मद साहेब यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच अनुषंगाने मिलादुन्नबीनिमित्त रक्तदान शिबिर, मिलाद कॉन्फ्रेंस, स्पर्धा परीक्षा आदि कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!