बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहरातील रस्ते आज महिला शक्तीचा जयघोष आणि भक्तिरसाने अक्षरशः दुमदुमून गेले! श्री भक्ती गणेश महिला मंडळ व महालक्ष्मी बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य महिला कावड यात्रेचे बुलढाणा अर्बन संस्थेच्या मुख्य शाखेत उत्साहपूर्ण आणि दिमाखदार स्वागत करण्यात आले.
कावड यात्रेत सहभागी झालेल्या महिलांसाठी बुलढाणा अर्बनच्या मुख्य शाखेच्या वतीने थंडगार लिंबू सरबत वाटप करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक उपाख्य ‘भाईजी’, अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर, अनंताभाऊ देशपांडे आणि सरव्यवस्थापक कैलास कासट यांच्या शुभहस्ते या सेवाभावी उपक्रमाचा प्रारंभ झाला.
यावेळी बुलढाणा अर्बनच्या मुख्यालयातील महिला कर्मचाऱ्यांनी कावडधारी महिलांवर गुलाबपुष्पांचा वर्षाव करत यात्रेचे जल्लोषात स्वागत केले. त्यामुळे संपूर्ण परिसरात भक्ती, उत्साह आणि महिला शक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळाला.
संस्थापक अध्यक्ष भाईजी आणि डॉ. सुकेश झंवर यांच्या शुभहस्ते विधिवत आरती करण्यात आली. या प्रसंगी संस्थेचे सर्व विभागप्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बुलढाणा अर्बनच्या या सामाजिक व सेवाभावी उपक्रमाने कावड यात्रेचा उत्साह आणखी द्विगुणित केला!











Total Users : 3337910