खामगाव (हॅलो बुलढाणा) ‘गण गण गणात बोते’च्या गजरात लाखो भाविकांचा महासागर आज खामगाव-शेगाव मार्गावर लोटला. तब्बल दोन महिने आणि सुमारे पंधराशे किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण करून श्री संत गजानन महाराजांची पालखी पहाटे साडेपाच वाजता अंतिम १८ किलोमीटरच्या प्रवासासाठी शेगावकडे निघाली. मात्र पालखी पुढे जात असताना तिच्या मागे सुरू झालेल्या एका अनोख्या ‘स्वच्छता दिंडी’ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले
ॲड. शर्वरी रविकांत तुपकर यांच्या पुढाकारातून ‘रविकांत तुपकर युथ फाउंडेशन’ आणि ‘सखी प्रतिष्ठान, बुलढाणा’च्या संयुक्त विद्यमाने खामगाव-शेगाव पालखी मार्गावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पालखीच्या मागे पडलेल्या पाण्याच्या पिशव्या, प्लास्टिकच्या बाटल्या, खाद्यपदार्थांची पाकिटे आणि इतर कचरा कार्यकर्त्यांनी गोळा करत संपूर्ण मार्ग स्वच्छ केला.
केवळ स्वच्छतेचे आवाहन न करता ॲड. शर्वरी तुपकर स्वतः हातात झाडू घेऊन रस्त्यावर उतरल्या. सखी प्रतिष्ठानच्या महिला आणि युथ फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनीही त्यांच्यासोबत स्वच्छतेची ही अनोखी वारी केली.
“महाराजांच्या दर्शनासोबत स्वच्छतेची सेवा हीच खरी भक्ती,” असी प्रतिक्रिया ॲड. तुपकर यांनी भाविकांशी संवाद साधताना दिला या उपक्रमात सखी प्रतिष्ठान, बुलडाणा च्या ऍड शर्वरी तुपकर, मनिषा पवार, स्नेहल गायकवाड, कल्पना टाले, साक्षी अंभोरे,जया टेकाळे,जयश्री खेडेकर, अश्विनी खेडेकर,माधुरी रिंढे, नीता आसाबे, मीरा आसाबे, किरण मेहुणकर, पूजा जाधव यांच्यासह ‘रविकांत तुपकर युथ फाउंडेशन’चे डॉ. ज्ञानेश्वर टाले, विनायक सरनाईक, ॲड. प्रवीण सुरडकर,रामेश्वर अंभोरे, शुभम राऊत, पियुष चव्हाण,गजानन टेकाळे, कार्तिक खेडेकर,विठ्ठल खेडेकर, आकाश राऊत, अमोल तोंडे, आदित्य उन्हाळे,देवा आखाडे, गणेश गरड,अरविंद दांदडे,नंदू जाधव,सौरभ सावजी,अमोल मांडवेकर, अभिजित दिघोळे, पवन साबळे, अनिल साबळे, सीताराम चव्हाण, विनोद साबळे, रवींद्र मांझा, विनोद तितरे, संतोष शेळके, चेतन कणखर सहभागी झाले होते.यांच्यासह अनेक कार्यकर्ते व महिलाही सहभागी झाल्या.















Total Users : 3315457