चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) राजकीय आणि सामाजिक आंदोलनांमधून अन्यायाविरोधात सातत्याने आवाज उठवणारे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष भाई विजय पंढरीनाथ गवई यांनी राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे चिखली शहरासह जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
गजानन नगर, चिखली येथे राहणारे भाई विजय गवई (वय ४८) यांनी सकाळी सहाच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांसह समर्थकांना मोठा धक्का बसला आहे.
अगदी कमी वयापासून राजकारणात सक्रिय झालेल्या गवई यांनी समाजातील वंचित आणि अन्यायग्रस्त घटकांच्या प्रश्नांसाठी अनेक आंदोलने केली होती. आक्रमक वक्तृत्व, संघर्षशील भूमिका आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणारा नेता म्हणून त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.
काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, त्यांनी हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणामुळे उचलले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.















Total Users : 3304351