मेहकर (अयाज़ शाह/हॅलो बुलढाणा) विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव येथील संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता शारंगधर बालाजी नगरी मेहकर येथे पैनगंगा नदीच्या तीरावर भाविकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत भव्य स्वागत करण्यात आले. संत गजानन महाराजांच्या पालखीच्या स्वागताची मेहकरमधील जुनी आणि भव्य परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात पाहायला मिळाली.यावेळी शहरात भक्तीचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.
पालखीच्या स्वागतासाठी शहरातील प्रमुख मार्गांवर ठिकठिकाणी भगवे पताके लावण्यात आले होते. तसेच आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. विविध मंडळांच्या वतीने छोटे-छोटे स्टेज उभारून श्रींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करत वारकरी आणि पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
पालखीचे मेहकरमध्ये आगमन होताच आमदार सिद्धार्थ खरात, माजी आमदार डॉ. संजय रायमूलकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव, नगरसेवक सुरेश वाळुकर आणि शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुदेश लोढे यांनी पालखीचे स्वागत करून श्रींचे दर्शन घेतले.
मेहकर नगर परिषदेचे नगराध्यक्ष किशोर गारोळे यांच्या हस्ते श्रींच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी रामराजे कापरे, नगरसेविका रूपाली गारोळे, नगरसेवक विलास चनखोरे, महेश रिढे, सतीश ताजणे, निसार अन्सारी, नितीन तुपे यांच्यासह नगर परिषद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
लोणार वेस चौकात महेश परिवाराचे प्रमुख डॉ. सुभाष लोहिया, महेश क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष गोपाल मोदानी, शारंगधर बालाजी संस्थानचे अध्यक्ष दीपक पांडे, सचिव उमेश मुंदडा आणि व्यवस्थापक हनुमंत देशमुख यांनी पालखीचे स्वागत केले.
पोलीस ठाण्यासमोर पत्रकार बांधवांच्या वतीने वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी तसेच चहा-पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी तानशीराम माणघाळे, पत्रकार सिद्धेश्वर पवार, विशाल काबरा, जयचंद बाठिया, डॉ. विलास वराडे, ओमप्रकाश देवकर, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानंद देशमुख, रफीकभाई कुरेशी, जुगराज पठे, प्रवीण गायकवाड, भरत सारंडा, विश्वंभर दळवी यांच्यासह पत्रकार बांधवांनी पालखीचे स्वागत केले.
शिवाजी हायस्कूलमध्ये पालखीचा मुक्काम
संत गजानन महाराजांच्या पालखीचा आज रात्री श्री शिवाजी हायस्कूल येथे मुक्काम राहणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था अग्रवाल परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे. रवि अग्रवाल, संजय अग्रवाल, विठ्ठल अग्रवाल आणि श्याम अग्रवाल यांनी भोजनाची व्यवस्था केली आहे.
पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मेहकर पोलिस ठाण्याचे ठाणेदार व्यंकटेश आलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मण कटक, विजय बेडवाल, मोहम्मद परसुवाले यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.













Total Users : 3295073