बुलढाणा (हॅलो बुलढाणा) देशातील कायदा व सुव्यवस्थेची ढासळलेली स्थिती, विद्यार्थ्यांवरील व आंदोलकांवर झालेला लाठीमार आणि विविध सुरक्षा मुद्यांवरून विरोधकांकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली असून, शिवसेनाच्या राज्य प्रवक्त्या ॲड.जयश्रीताई शेळके यांनी देखील विद्यार्थ्यांवर अमानुष अत्याचारला शहा जबाबदार असल्याचे सांगत पदावरून त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
दिल्लीत पेपरफुटी आणि परीक्षा व्यवस्थाविरोधात शांतीपूर्वक आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांकडून पॅलेट गन आणि खिळे ठोकलेल्या लाठ्यांचा वापर करण्यात आल्याचा गंभीर आरोप जयश्रीताई शेळके यांनी केला आहे. विद्यार्थ्यांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली.या देशातील विद्यार्थी दहशतवादी आहेत काय? हे कुणाच्या सांगण्यावरून झालं? असा प्रश्न जयश्रीताई शेळके यांनी उपस्थित केला आहे. ‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. 20 जुलै हा काळा दिवस असून त्या दिवशी विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष अत्याचाराला गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहे. त्यामुळे आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची पदावरून हकालपट्टी झाली पाहिजे,अशी मागणी जयश्रीताई शेळके यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.










Total Users : 2730077