बुलढाणा (हॅलो बुलढाणा) अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ रद्द करावे या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने आज सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात समोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.
राज्य शासनाने अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात आंबेडकरी समाजामध्ये संतापाची भावना आहे.उपवर्गीकरणाच्या विरोधात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार तथा रिपाई राष्ट्रीयध्यक्ष डॅा. रामदासजी आठवले यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील रिपाइं कार्यकर्ते यांना आदेश दिले की, 27 जूलैला प्रत्येक जिल्हा कचेरीवर आंदोलन करून उपर्गीकरणाचा निषेध नोंदवा तो आदेश घेऊन आज राज्यभरात ठीक ठिकाणी आंदोलने होत आहेत. त्यानुसार बुलढाणा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षानेही आक्रमक भूमिका घेत पक्षाचे जिल्हाध्यक्ष समाजभुषण गोल्डमॅन भाई दिलीपराव खरात, जिल्हा संपर्क प्रमुख बाबासाहेब जाधव, समाजसेवक इंजि.भैयासाहेब पाटील, विदर्भकार्यध्यक्ष मुरलीधर गवई, जिल्हा महिलाध्यक्ष वंदनाताई वाघ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय समोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी एससी आरक्षण वर्गीकरणाच्या विरोधात आणि राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. बराच वेळ निदर्शने केल्यानंतर एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
शासनाने गठित केलेले बदर समिती पूर्णपणे बोगस असून तिचा अहवाल तात्काळ खुला करण्यात यावा. ही समिती रद्द करण्यात यावी जातीय जनगणना झाल्याशिवाय उपवर्गीकरण करू नये सध्याच्या अपुऱ्या माहितीच्या आधारे उपवर्गीकरण केल्यास एकाच समाजाचा विचार होऊन अनुसूचित जातीमधील उर्वरित 58 जातीवर प्रचंड अन्याय होईल उपवर्गीकरणाच्या मुद्द्यामुळे बौद्ध मातंग चांभार ढोर भंगी लोहार यासह इतर 59 अनुसूचित जातीमधील समाजामध्ये विशेषता बौद्ध व मातंग समाजामध्ये दुरावा निर्माण होत आहे शासनाने उपवर्गीकरणाच्या माध्यमातून दोन्ही समाजात दरी निर्माण करू नये सध्या उपवर्गीकरणाच्या विरोधात संपूर्ण दलित आंबेडकरवादी अनुसूचित जातीतील समाज रस्त्यावर उतरून तीव्र विरोध नोंदवत आहे त्यामुळे शासनाने उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करा करावा अन्यथा महाराष्ट्रात यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पक्षाचे जिल्हाध्यक्ष समाजभूषण भाई दिलीप खरात व रिपाइं संपर्क प्रमुख पत्रकार बाबासाहेब जाधव यांनी दिला. यावेळी जिल्हाउपाध्यक्ष प्रा. दिलीप काकडे, कार्यध्यक्ष मुक्तार पठाणसर, युवाजिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष नबाब मिर्झा बेग, सर्वश्री तालुकाध्यक्ष बुलडाणा केशवराव सरकटे, चिखली हीम्मराव जाधव,मेहकर (राणा) अतीश मोरे,मोताळा बाळासाहेब आहिरे, दे.राजा महीलाध्यक्षा सुषमा झिने, बुलडाणा उषाताई इंगळे, राजेश हिवाळे,, अजय झिने, आनंद गवई, राजू रंधवे, प्रमोद रंधवे,राहूल आवसरमोल, शंकर म्हस्के, किरण गवई, फकीरा निकाळजे, साहिल आहीरे, दत्ता राहणे, उपसरपंच महेबूब खान शेर खान,शिवाजी खरात, सुखदेव कांबळे, देवानंद तुपमाने
यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.












