spot_img
spot_img

कर्जमाफीच्या पहिल्याच यादीत मोठ्या प्रमाणावर तफावत! बँका शेतकऱ्यांकडून जबरदस्ती पैसे भरूनघेत असल्याचा संताप! ‘क्रांतिकारी’ चे विनायक सरनाईक आक्रमक!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक थांबवा… सरकारने दिलेला शब्द पाळावा, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरेल असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे युवा नेते विनायक सरनाईक यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदनातून दिला आहे.

राज्य सरकारने दोन लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती. मात्र जाहीर झालेल्या पहिल्याच यादीत मोठ्या प्रमाणावर तफावत आढळून आली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या बँकेतील थकीत कर्जाची रक्कम एक आहे, तर सरकारच्या कर्जमाफीच्या यादीत त्यापेक्षा खूपच कमी रक्कम दाखवण्यात आली आहे. यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि असंतोष निर्माण झाला आहे. सरकारने पाठवलेली कर्जमाफीची रक्कम आणि बँकेतील कर्जाची रक्कम यातील तफावत बँकेने शेतकऱ्यांना OTS मध्ये माफ करावी(सोडून द्यावी )अशा सूचना सरकार कडून असताना बँका शेतकऱ्यांकडून जबरदस्ती वरील पैसे भरून घेत आहेत. जर दोन लाखांपर्यंत संपूर्ण कर्जमाफी देण्याचे सरकारने जाहीर केले होते, तर शेतकऱ्यांच्या खात्यात कमी रक्कम का दाखवली जात आहे?आणि वरील पैसे बँका शेतकऱ्यांकडून का भरून घेतायेत??सरकार केवळ मुद्दलाचा काही भाग भरून उर्वरित रक्कम किंवा व्याज शेतकऱ्यांकडून वसूल करण्याचा प्रयत्न तर करत नाही ना ? असा प्रश्न आम्हा शेतकऱ्यांना पडला आहे.
या गंभीर प्रकाराविरोधात आज बुलढाणा येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे युवा नेते विनायक सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून आंदोलनाचा कडक इशारा देण्यात आला.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेची स्पष्ट भूमिका आहे की, सरकारने दिलेला शब्द पाळावा आणि दोन लाख रुपयांपर्यंतचे संपूर्ण कर्ज, मुद्दलासह व्याज, विनाअट सरसकट माफ करावे.बँकानी तफावत रक्कम शेतकऱ्यांकडून भरून घेऊन नये.कर्जमाफीच्या यादीतील सर्व तफावत तातडीने दूर करून प्रत्येक पात्र शेतकऱ्याला न्याय द्यावा.
सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली कोणतीही हातचालाखी करण्याचा प्रयत्न करू नये. शेतकऱ्यांची फसवणूक झाली किंवा दिलेला शब्द मोडला गेला, तर क्रांतिकारी शेतकरी संघटना संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरेल,असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

▪️उदाहरणे:
१) गजानन काकड
बँकेने व्याजासह थकीत कर्जाची रक्कम : ₹82,165
सरकारच्या कर्जमाफीच्या यादीत दाखवलेली रक्कम : ₹36,974

२) संजय पंडागळे (सेंट्रल बँक, चिखली)
बँकेने व्याजासह थकीत कर्जाची रक्कम : ₹23,756
कर्जमाफी पोर्टलवर दाखवलेली रक्कम : ₹18,662

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!