spot_img
spot_img

Exclusive : गळ्यापर्यंत पाण्यातून ‘देवीच्या दरबारात’ पोहोचले आमदार सिद्धार्थ खरात… उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीच नव्हे, थेट पंतप्रधान व्हावेत म्हणून कमळजा मातेपुढे केला मोठा संकल्प!

मेहकर (हॅलो बुलढाणा) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघात आमदार सिद्धार्थ खरात आणि लोकप्रिय नगराध्यक्ष किशोर गारोळे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरणपूरक आणि आरोग्यविषयक उपक्रमांचा अक्षरशः धडाका पाहायला मिळाला. “उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच नव्हे, तर भविष्यात देशाचे पंतप्रधान व्हावेत,” अशी जोरदार प्रार्थना आमदार सिद्धार्थ खरात यांनी लोणार सरोवरातील कमळजा माता मंदिरात केली.

कार्यक्रमाची सुरुवात मेहकर येथील श्री शारंगधर बालाजी मंदिरात उद्धव ठाकरे यांच्या उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी विशेष प्रार्थनेने झाली. त्यानंतर पंचायत समिती व तहसील कार्यालय परिसरात वृक्षारोपण, ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप आणि हिवराश्रम येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.

मात्र, सर्वाधिक लक्षवेधी ठरला तो कमळजा माता मंदिरातील प्रसंग! मंदिर परिसर पाण्याने वेढलेला असतानाही आमदार सिद्धार्थ खरात यांनी पदाधिकारी आणि शिवसैनिकांसह गळ्यापर्यंत पाण्यातून धाडसी वाट काढत मंदिर गाठले. तेथे उद्धव ठाकरे यांच्या यशस्वी राजकीय वाटचालीसाठी, राज्यात पुन्हा शिवसेनेचे सरकार स्थापन होण्यासाठी आणि देशाचे नेतृत्व त्यांच्या हाती यावे, यासाठी आरती करून विशेष आशीर्वाद मागण्यात आला.

यावेळी नगराध्यक्ष किशोर गारोळे, निंबाजी पांडव, ॲड. आकाश घोडे यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार खरात यांच्या या उपक्रमामुळे मेहकर-लोणार मतदारसंघात दिवसभर शिवसैनिकांचा उत्साह आणि राजकीय जोश ओसंडून वाहताना दिसला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!