बुलढाणा (हॅलो बुलढाणा) माणसाप्रमाणेच वन्यप्राणी पण काही आवड राखून असतात. तेच ते नको म्हणून चव पालट करतात. नवे खाद्य मिळाले आणि त्याची एकदा चटक लागली की मग बघायलाच नको. म्हणून खाद्य मिळणारे स्थान कवटाळून बसण्याचा रोमहर्षक प्रकार अस्वलबाबत काल शनिवारी दिसून आला आहे.राजुर घाटातील मारुती मंदिरात असे अनेक प्रकार घडलेत.
बुलढाणा लागतचा नागमोडी
राजुर घाट या जंगलव्याप्त परीसरात पाणी पिण्यासाठी किंवा ख्याद्यांन्नासाठी जंगली श्वापद ये-जा करत असतात. मात्र आता तर हद्दच झाली असून एक मादा अस्वल आणि तिचे पिल्लू थेट राजूर घाट येथील मारोती मंदिरात चक्क प्रसाद खाण्यासाठी आल्याचा व्हिडिओ जैस्वाल कुटुंबानी काढला. काल अस्वल मंदिर परिसरात भटकत होते, तेल म्हणा की प्रसाद याकारणाने ती मादी पिल्ला सह आली असावी, असा अंदाज आहे. अस्वल थेट मारोती मंदिरात घुसली आणि भक्तांनी ठेवलेला महाप्रसाद खाऊन तेथून धूम ठोकली. या मंदिरावर येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांची बरीच रेलचेल असते आणि अशा वर्दळीच्या ठिकाणी जंगली प्राणी आणि त्यातही अस्वल आला असल्याने सध्या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले, त्यामुळे वन विभागाने याकडे तात्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.











