spot_img
spot_img

सायंकाळी शेतात उभी होती… सकाळी थेट गायब! धानोरा शिवारातून ₹८० हजारांची ट्रॉली नेमकी कुणी पळवली?

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ज्ञानदेव राजनकर) तालुक्यातील धानोरा शिवारात चोरट्यांनी थेट शेतात उभी असलेली ट्रॉली लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तब्बल ₹८० हजार किमतीची ट्रॉली रातोरात गायब झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामीण भागातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सिद्धिविनायक नगर, जळगाव जामोद येथील रविंद्र प्रल्हाद निर्मळ (वय ६३) यांच्या मालकीची लकी मोटार कंपनीची जुनी वापरातील ट्रॉली क्रमांक एमएच-२८-ई-१८१५ ही धानोरा शिवारातील गट क्रमांक २७३ मधील शेतात उभी करण्यात आली होती.

२४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून २५ जुलै रोजी सकाळी ११ वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने ट्रॉली चोरून नेली. शेतात पोहोचल्यानंतर ट्रॉली गायब असल्याचे निर्मळ यांच्या निदर्शनास आले.

त्यांच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी अपराध क्रमांक ४८०/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. तयब अली तपास करीत असून, ट्रॉलीसह चोरट्याचा कसून शोध सुरू आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!