spot_img
spot_img

BREAKING! ‘इथे लाच घेतली जात नाही’ची पाटी लावली… अन् अधिकारीच ₹25 हजारांच्या लाचेत अडकले! 8 दिवस जेलनंतर संदीप मोरे अखेर निलंबित; जिल्हा परिषदेत मोठी खळबळ!

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा) “आम्ही आपल्या पगारावर समाधानी असून या कार्यालयामध्ये कोणतीही लाच स्वीकारली जात नाही,” अशी ठळक पाटी कार्यालयासमोर लावणारे पंचायत विस्तार अधिकारी संदीप कुमार मोरे अखेर जिल्हा परिषदेच्या सेवेतून निलंबित झाले आहेत. १५ जुलै रोजी अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात कथित २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना मोरे यांना अटक करण्यात आली होती.

या कारवाईनंतर मोरे यांना तब्बल आठ दिवस कारागृहात मुक्काम करावा लागला. त्यानंतर २१ जुलै रोजी त्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी ऐश्वर्या कोरे यांनी दिली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईमुळे जिल्हा प्रशासनाची बदनामी झाल्याचे कारण निलंबन आदेशात नमूद करण्यात आले आहे. निलंबन काळात मोरे यांना लवकरच अन्य ठिकाणी मुख्यालय देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

तक्रारदाराच्या तक्रारीनंतर ACBच्या अधिकाऱ्यांनी पंचायत समितीतील पंचायत विभागात सापळा रचला होता. ‘लाच स्वीकारली जात नाही’ असा दावा करणाऱ्या कार्यालयातील अधिकारीच लाचेच्या आरोपात अडकल्याने या प्रकरणाची संपूर्ण जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!