spot_img
spot_img

नॉन्सेन्स! चिखली रोडवरील विकला ओपन स्पेस! -प्लॉट घेणारा तो जुगाडी पुढारी कोण?

बुलढाणा (हॅलो बुलढाणा)पुढाऱ्याच्या राजकीय बळाने चिखली रोडवरील शासकीय जागेत जुगाड करण्यात आले. अर्थात ओपन स्पेस विकून नागरिकांची फसवणूक करण्यात आली आहे. यामध्ये एका पुढार्‍याचाही प्लॉट आहे.

शहरातील चिखली रोडवर हजारो मीटर ओपन स्पेस च्या शासकीय जागेत प्लॉट टाकून शासनाची फसवणूक करत, प्लॉटची नियमबाह्य विक्री करण्यात आली. डाबर याने लाखो रुपये खर्च करून भूखंड गिळला आहे.चिखली रोड वरील गट क्रमांक 58 मधील परिसरात भूखंड व्यवसायातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या भूखंड व्यावसायिकाची लालसा वाढत चालली आहे. भूखंडावर असलेले ओपन स्पेस विक्री करुन डाबरने मोठी माया जमविली असून, यात राजकीय व शासकीय अधिकाऱ्यांचा हात असल्याचे दिसून येत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्षवेधने गरजेचे झाले असून फसवणूक झालेल्या नागरिकांना न्याय देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!