चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) चिखली-खामगाव मार्गावरील टाकरखेड मुसलमान परिसरात मध्यरात्री दोन मालवाहू ट्रकांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. काल रात्री अंदाजे १२ वाजेच्या सुमारास टाकरखेड-अमडापूर रोडवर हा भीषण अपघात घडला.
दोन्ही ट्रक वेगात समोरासमोर आल्याने झालेल्या धडकेचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. टक्कर इतकी जबरदस्त होती की, एक ट्रक रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाला.
सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दोन्ही ट्रकचालकांना किरकोळ दुखापत झाली असून, मोठा अनर्थ थोडक्यात टळला. हा अपघात अमडापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला असून, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही










