spot_img
spot_img

बँकेच्या जमिनीवर चमकले सोने… CCTV उघडताच समोर आला धक्कादायक धागा; बुलढाणा अर्बनच्या कर्मचाऱ्यांनी दाखवली अशी प्रामाणिकता की ग्राहकही झाला भावूक!

रिसोड (हॅलो बुलढाणा/अनिल राठोड) बँकेची साफसफाई सुरू असताना जमिनीवर अचानक सोन्याचा झुमका चमकला… कुणाचा आहे, कधी पडला आणि तो परत मिळणार का, असा प्रश्न निर्माण झाला. मात्र बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या रिसोड शाखेतील कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकतेमुळे काही तासांतच या रहस्याचा उलगडा झाला आणि हरवलेले सोने मूळ ग्राहकाच्या हातात सुखरूप पोहोचले.

१० जुलै २०२६ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास शाखेचे शिपाई गणेश पौळ नेहमीप्रमाणे साफसफाई करत होते. त्यावेळी त्यांना जमिनीवर सोन्याचा एक झुमका पडलेला दिसला. क्षणाचाही विलंब न करता आणि कोणताही मोह न बाळगता त्यांनी तो झुमका थेट शाखा व्यवस्थापक गजानन सरकटे यांच्याकडे सुपूर्द केला.

त्यानंतर सुरू झाला खऱ्या मालकाचा शोध! शाखा व्यवस्थापकांनी ९ जुलैचे CCTV फुटेज तपासले. फुटेजमध्ये ग्राहक सुनील राजू बलकार यांनी सोनेतारण कर्ज पूर्ण फेडल्यानंतर दागिने पिशवीत ठेवताना एक झुमका खाली पडल्याचे स्पष्ट दिसून आले.

बँकेने तात्काळ बलकार यांच्याशी संपर्क साधला. आवश्यक खातरजमा केल्यानंतर त्यांचा सोन्याचा झुमका परत देण्यात आला. हरवलेले सोने पुन्हा हातात पडताच ग्राहकही भावूक झाले. गणेश पौळ आणि गजानन सरकटे यांच्या प्रामाणिकपणा, सतर्कता आणि तत्परतेमुळे बुलढाणा अर्बनची विश्वासार्हता पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित झाली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!