spot_img
spot_img

BREAKING! डॉ. राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालयात नेमकं चाललंय काय? परीक्षार्थ्यांना वाटपासाठी आणलं ‘विनापरवाना’ उत्पादन; सभागृहात सापडले 8 बॉक्स, 320 पाकिटं… 1.53 लाखांचा माल जप्त, गुन्हा दाखल!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाण्यातील डॉ. राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालयात कृषी मित्र पदाच्या भरती परीक्षेदरम्यान विनापरवाना कृषी उत्पादन वाटपाचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे कृषी विभागाच्या गुणनियंत्रण पथकाने 28 जून 2026 रोजी महाविद्यालयाच्या तळमजल्यावरील सभागृहात धडक तपासणी केली असता Crob Booster (Potassium Humate 65%) या जैव उत्तेजक उत्पादनाचे तब्बल 8 मोठे बॉक्स आढळून आले. प्रत्येक बॉक्समध्ये 40 नग याप्रमाणे एकूण 320 पाकिटे जप्त करण्यात आली असून, प्रत्येक पाकिटाची किंमत 480 रुपये दाखवलेली आहे. या जप्त मुद्देमालाची एकूण अंदाजित किंमत 1 लाख 53 हजार 600 रुपये आहे.

या उत्पादनाची निर्मिती हिंदुस्तान एजी-टेक बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड, अनवा, ता. भोकरदन, जि. जालना या कंपनीमार्फत झाल्याचे नमूद आहे. कंपनीचे संचालक म्हणून दत्ता पांडुरंग जाधव यांचे नाव समोर आले आहे. घटनास्थळी उपस्थित समन्वयकांकडे साठवणूक, विक्री किंवा वितरणाबाबतचा वैध परवाना मागितला असता कोणतीही अधिकृत कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत. उलट, या उत्पादनातील 80 पाकिटे परीक्षार्थ्यांना वितरित केल्याचे सांगण्यात आल्याने प्रकाराचे गांभीर्य अधिक वाढले आहे.

कृषी अधिकारी भास्कर कारभारी राहाणे यांच्या फिर्यादीवरून बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात खत नियंत्रण आदेश 1985 व अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास GPSI धारकरी यांच्याकडे सोपविण्यात आला असून, कृषी परीक्षेच्या नावाखाली अवैध उत्पादन वितरणाचा हा प्रकार नेमका कुणाच्या आशीर्वादाने सुरू होता, याचा शोध पोलिसांनी घेणे गरजेचे आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!