spot_img
spot_img

शिवसेनेत नियुक्त्यांचा धडाका; जिल्हा उपसंघटकपदी वासुदेव राजनकर!

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या संघटनात्मक नियुक्त्यांना वेग आला असून बुलढाणा जिल्ह्यात शिवसेनेची ताकद आणखी वाढविण्यासाठी महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये वासुदेव राजनकर यांची बुलढाणा जिल्हा उपसंघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अनंता बकाल यांची जळगाव जामोद विधानसभा प्रमुखपदी, तर वसंत मिरगे यांची तालुका प्रमुखपदी निवड करण्यात आली.

मेहकर येथे मंगळवार, 23 जून रोजी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, संपर्कप्रमुख संजय सोनार, जिल्हाप्रमुख संतोष डिवरे आणि युवासेना लोकसभा प्रमुख चेतन घिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्ती सोहळा पार पडला. या नियुक्त्यांमुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नव्या पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आगामी काळात संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!