spot_img
spot_img

महाराष्ट्र संतांची भूमी की गुंडांची? बालकृष्ण महाराजांवरील हल्ल्याने सिंदखेडराजा पेटला

सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा/संदीप मेहेत्रे) येथे गौ सन्मान अभियानाचे महाराष्ट्र प्रभारी पूज्य संत श्री बालकृष्ण जी महाराज यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी हजारोंच्या उपस्थितीत भव्य निषेध मोर्चा व सभा पार पडली. संत समाज, सकल हिंदू समाज, गोभक्त, वारकरी संप्रदाय तसेच विविध धार्मिक व हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या सहभागाने संपूर्ण सिंदखेडराजा परिसर संतापाने दणाणून गेला.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे पूज्य बालकृष्ण जी महाराज सभेला उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांनी संदेशातून हा हल्ला अत्यंत गंभीर व प्राणघातक स्वरूपाचा असल्याचे सांगत, घटनेत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या सर्वांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. मला शासन आणि प्रशासनाकडून न्यायाची अपेक्षा आहे, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.

आंतरराष्ट्रीय कथावाचक युवाचार्य संत श्री विवेकदास जी शास्त्री महाराज यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, हा मोर्चा संत समाजाच्या आक्रोशाची केवळ सुरुवात आहे. न्याय मिळाला नाही, तर सिंदखेडराजाच्या भूमीवर देशभरातील संत-महंतांचा भव्य महाकुंभ भरू शकतो. स्वामी श्री अमोलनंद सरस्वती महाराज, हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटे, महाराष्ट्र गौ सेवा आयोगाचे सदस्य उद्धवजी नेरकर, गजानन महाराज सपकाळ यांच्यासह अनेक संत-महंतांनी हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला.

सभेत सर्व आरोपींना तात्काळ अटक, निष्पक्ष चौकशी आणि कठोर कायदेशीर कारवाईची एकमुखाने मागणी करण्यात आली. संघटित स्वरूपात हिंसक कृत्य झाल्याचा आरोप असल्याने आवश्यक निकष पूर्ण होत असल्यास मोका अंतर्गत कारवाईचा विचार करावा, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी श्री ॲड संदीप मेहेत्रे, श्री शिवादादा पुरंदरे, श्री उज्जवल गव्हाड श्री शैलेश गोंधणे, श्री प्रवीण अंभोरे, श्री कैलास मेहेत्रे श्री किशोर म्हस्के, श्री अजय कुरंगळ, श्री प्रशांत जांबिवाळ, श्री राजेश पिंगळे, श्री राम शर्मा, श्री आदित्य पाटील, श्री रोहित पगारिया, श्री अक्षय भोजने, श्री मनोज घाटोळ, श्री शिव ठाकूर, श्री श्रावण निळकंठ, श्री केशवजी महाराज, श्री गोकुलभाई, श्री अशोक अग्रवाल, श्री शरद भाला, श्री ओमप्रकाश गोंधणे, श्री सुनील लाहोटी, श्री प्रेमराजजी भाला, श्री राजू शिंगणे, श्री अमोल अंधारे, श्री उद्धवजी नेरकर, श्री सुनील भोजवानी श्री डॉ नरेंद्र जोशी वडनेर यांच्यासह विविध सामाजिक, धार्मिक व हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेनंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले. “संतांचा सन्मान आणि कायद्यावरील विश्वास टिकवायचा असेल, तर दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे,” असा इशारा संत समाजाने दिला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!