बुलडाणा (हॅलो बुलढाणा) येथील निलेश पाटील व भावनाताई पाटील यांची कन्या कु. वंशिका हिने NIFT (National Institute of Fashion Technology) प्रवेश परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर ७१ वा क्रमांक मिळवत बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.या यशाबद्दल अभिता ॲग्रो कंपनीचे सीईओ सुनील शेळके यांनी वंशिकाचे अभिनंदन केले आहे.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) परीक्षेत यश मिळवणे म्हणजे फॅशन आणि डिझाईनच्या क्षेत्रात उज्ज्वल भविष्याची सुरुवात करणे होय.या परीक्षेत यश मिळवण्यासाठी योग्य नियोजन, सर्जनशीलता आणि सातत्य यांची गरज असते. कु. वंशिकाने हे यश साध्य केले.
पारंपरिक वाटेऐवजी स्वतःची वेगळी वाट निवडत, अथक परिश्रम, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर वंशिकाने हे दैदिप्यमान यश संपादन केले. तिचे हे यश असंख्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर कोणतेही स्वप्न साकार करता येते, याचे ती उत्तम उदाहरण ठरली आहे. कु. वंशिका पाटील यांचे आई-वडील तसेच सर्व शिक्षकांचे देखील शेळके यांनी मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत!












