spot_img
spot_img

सभापती राम शिंदे उद्या बुलढाण्यात; अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमाला लावणार उपस्थिती

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) महाराष्ट्र विधानपरिषद सभापती राम शिंदे गुरुवार, दि. 4 जून 2026 रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्यामुळे शेगावपासून बुलढाण्यापर्यंत प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे.

दौरा कार्यक्रमानुसार राम शिंदे यांचे सकाळी 5.40 वाजता संभाजीनगर येथून शेगाव रेल्वे स्थानकावर आगमन होणार आहे. त्यानंतर ते श्री गजानन महाराज संस्थानच्या भक्तनिवासाकडे प्रयाण करतील. सकाळी 8 वाजता ते श्री गजानन महाराज मंदिरात दर्शन घेणार असून, त्यानंतर सकाळी 8.20 वाजता मोटारीने बुलढाण्याकडे रवाना होतील.

सकाळी 10 वाजता बुलढाणा येथील तहसील चौकात त्यांचे आगमन होणार असून, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास ते प्रमुख उपस्थिती लावणार आहेत. कार्यक्रमानंतर दुपारी 12 वाजता ते छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!