spot_img
spot_img

लग्नाहून परतताना काळाची झडप! पत्रकाराच्या तरुण मुलाचा भीषण अपघातात मृत्यू; मित्र गंभीर जखमी

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) लग्न समारंभ आटोपून आनंदाने घरी परतणाऱ्या तरुणांवर काळाने अचानक घाला घातला. धाड नाक्याजवळ नांद्राकोळी रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात २६ वर्षीय मंगेश दिगांबर कंकाळ याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र विजय दगडूबा जिने (वय २४) गंभीर जखमी झाला आहे. मंगेश हा परिसरातील पत्रकार तथा ‘शब्द लेख’ साप्ताहिकाचे मुख्य संपादक दिगंबर कंकाळ यांचा मुलगा असल्याने पत्रकार वर्तुळात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश आपल्या दोन मित्रांसह एका लग्नसमारंभासाठी गेला होता. समारंभ आटोपून ते स्प्लेंडर दुचाकीने (MH 28 BT 2080) घरी परतत असताना २७ मे रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की मंगेशचा जागीच मृत्यू झाला.

घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. विजय जिने याच्यावर उपचार सुरू असून तिसऱ्या मित्राला किरकोळ दुखापत झाली आहे. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून पुढील तपास सुरू आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!