spot_img
spot_img

ॲड. शर्वरी तुपकर यांचा आक्रमक पवित्रा… रात्री ११ वाजता धाडच्या पेट्रोल पंपावर धडक देत अखेर शेतकऱ्यांना डिझेल द्यायलाच भाग पाडले..!

धाड (हॅलो बुलडाणा) गेल्या तीन दिवसांपासून डिझेल उपलब्ध असूनही शेतकऱ्यांना ताटकळत ठेवण्यात येत होते. खरिपाचा हंगाम तोंडावर असताना ट्रॅक्टरच्या दोन-दोन किलोमीटर रांगा लागल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत शेतकरी डिझेलच्या प्रतीक्षेत उभे असताना पंप प्रशासन ‘आता डिझेल मिळणार नाही’ म्हणत शेतकऱ्यांना परत पाठवत होते.

माहिती मिळताच ॲड. शर्वरी रविकांत तुपकर यांनी थेट पेट्रोल पंपावर धडक देत पंप चालक, कर्मचारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. सुरुवातीला मुजोरी करणाऱ्या प्रशासनाला अखेर नमते घ्यावे लागले आणि प्रशासकीय हस्तक्षेपानंतर रात्री ठीक १२ वाजता डिझेल वाटप सुरू करण्यात आले. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

“खरिपाच्या तोंडावर बळीराजाला डिझेलसाठी वणवण भटकायला लावणाऱ्यांची मुजोरी सहन केली जाणार नाही,” असा इशाराही यावेळी देण्यात आला.यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बंडू उर्फ समाधान नागवे, आकाश माळोदे, गजानन नाईकवाडे यांच्यासह परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!