बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांना मोठा कायदेशीर झटका बसला असून, प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकावल्याप्रकरणी आता पोलिस चौकशीचा मार्ग मोकळा झाला आहे. कोल्हापूर सत्र न्यायालयाने राजारामपुरी पोलिसांना चौकशीस परवानगी दिल्यानंतर राज्यभरात या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे.
‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून संतापलेल्या संजय गायकवाड यांनी प्रशांत आंबी यांना फोनवरून शिवीगाळ करत “घरात घुसून मारेन, जीभ छाटेन” अशी धमकी दिल्याचा ऑडिओ व्हायरल झाला होता. या ऑडिओनंतर राज्यात प्रचंड राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण झाला होता. विशेष म्हणजे या संभाषणात दिवंगत विचारवंत गोविंद पानसरे यांच्याबाबतही आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आल्याचा आरोप आहे.
प्रशांत आंबी यांनी कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र सुरुवातीला पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याची चर्चा होती. आता न्यायालयाच्या आदेशामुळे पोलिसांना अधिकृत चौकशी करता येणार असून, आमदार गायकवाड यांना चौकशीसाठी नोटीस बजावली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, प्रशांत आंबी यांनी धक्कादायक दावा करत सांगितले की, गेल्या महिनाभरात त्यांना १०० पेक्षा अधिक धमकीचे फोन आले आहेत. त्यामुळे त्यांनी नव्याने तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.










Total Users : 3275530