spot_img
spot_img

EXCLUSIVE कोकिळा आवाजाने जिंकली मनं! अनंताभाऊ देशपांडेंच्या स्वरांतून ‘नदीच्या पल्याड बाई’ ला नवा जीव

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) वामनदादा कर्डक यांच्या स्मृतिदिनानिमित्त बुलढाणा अर्बन मिडिया हाऊसतर्फे सादर करण्यात आलेल्या “नदीच्या पल्याड बाई” या अजरामर गीताने रसिकांच्या मनाला अक्षरशः स्पर्श केला आहे. विशेष म्हणजे हे गीत आपल्या भावपूर्ण आणि कोकिळा स्वरांत सादर करणारे अनंताभाऊ देशपांडे यांचे सर्वत्र कौतुक होत असून बुलढाण्याला त्यांच्या रूपाने लाभलेला हा आवाज जिल्ह्याचा अभिमान ठरत आहे.

“नदीच्या पल्याड बाई, झाडी लई दाट…” या ओळींतून माहेरच्या ओढीने व्याकूळ झालेल्या स्त्रीच्या भावना ज्या हळुवारपणे व्यक्त होतात, त्याच भावना अनंताभाऊंनी आपल्या आवाजातून जिवंत केल्या. गीतातील प्रत्येक शब्द त्यांनी इतक्या आत्मीयतेने गायला की श्रोते थेट आपल्या गावाकडच्या आठवणींमध्ये हरवून गेले. त्यांच्या स्वरांतून ग्रामीण संस्कृती, मातीचा सुगंध, नात्यांची ऊब आणि माहेराची ओढ जणू सजीव झाली.

अनंताभाऊ देशपांडे हे केवळ गायक नाहीत, तर भावनांना स्वरांतून जपणारे एक संवेदनशील कलावंत असल्याची भावना अनेक रसिकांनी व्यक्त केली. बुलढाण्यात असा कोकिळा आवाज लाभणे ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असून, येणाऱ्या काळात अनंताभाऊ आपल्या गायकीच्या जोरावर जागतिक पातळीवरही रसिकांची मनं जिंकतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

या उपक्रमासाठी डॉ. सुकेश झंवर, सौ. कोमल झंवर आणि राधेश्यामजी चांडक यांची प्रेरणा लाभली. यावेळी बुलढाणा अर्बन मिडिया हाऊसचे सदस्य, कलाकार आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक माध्यमांवरही या गीताला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!