spot_img
spot_img

‘देव तारी त्याला कोण मारी!’ ग्राहकासोबत बोलत असतानाच डोक्यावर कोसळला सिलिंग पंखा; बुलढाण्यातील थरारक घटना CCTV मध्ये कैद

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहरातील कारंजा चौक परिसरात एक थरारक घटना घडली असून, “देव तारी त्याला कोण मारी” या म्हणीचा प्रत्यय नागरिकांना आला. येथील व्यावसायिक संजय महाजन हे नेहमीप्रमाणे आपल्या दुकानात ग्राहकासोबत संभाषण करत होते. दुकानातील वातावरण शांत असतानाच अचानक सिलिंगवरील पंखा जोरात खाली कोसळला आणि काही क्षणांसाठी एकच खळबळ उडाली.

विशेष म्हणजे, पंखा थेट महाजन यांच्या अगदी जवळ पडला. अवघ्या काही इंचांच्या अंतराने ते बचावले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी काही क्षणांसाठी उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला. संपूर्ण घटना दुकानातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून, व्हिडीओ पाहून नागरिकही हादरले आहेत.

उन्हाळ्यात सतत सुरू असलेल्या पंख्यांच्या वापरामुळे जुने सिलिंग फॅन धोकादायक ठरत असल्याची चर्चा आता पुन्हा रंगू लागली आहे. वेळेवर देखभाल न केल्यास अशा घटना जीवावर बेतू शकतात, अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. “हॅलो बुलढाणा” नागरिकांना आवाहन करते की, घर व दुकानांतील जुने पंखे, हुक आणि वायरिंगची तात्काळ तपासणी करून घ्यावी.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!