spot_img
spot_img

डिझेलसाठी ट्रॅक्टरच्या रांगा; खरीप तोंडावर शेतकरी संकटात!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यात इंधन टंचाई नाही असा दावा प्रशासनाकडून केला जात असला, तरी प्रत्यक्षात मात्र पेट्रोल पंपांवर दिसणारे चित्र वेगळीच वस्तुस्थिती सांगत आहे. जानेफळ आणि मलकापूर पांगरा येथील पेट्रोल पंपांवर डिझेलसाठी ट्रॅक्टरच्या लांबच लांब रांगा लागल्याने खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.

सध्या शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त असताना डिझेल अभावी नांगरणी, वखरणी आणि पेरणीपूर्व तयारीची कामे ठप्प होण्याची वेळ आली आहे. अनेक शेतकरी तासन्तास रांगेत उभे राहत असून, तरीही पुरेसे डिझेल मिळत नसल्याची तक्रार व्यक्त होत आहे. एकीकडे पावसाचे संकेत आणि दुसरीकडे डिझेलसाठी हेलपाटे अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून दिली जात आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोल पंपांवर वाहनांच्या वाढत्या रांगा पाहता नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाचे दावे आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये मोठी तफावत दिसून येत असून, तातडीने इंधन पुरवठा सुरळीत न झाल्यास खरीप हंगामावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!