चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) वाढदिवस म्हटला की फ्लेक्सबाजी, फटाके आणि अनावश्यक खर्च असा नेहमीचा ट्रेंड असतो. मात्र याला फाटा देत एका सामाजिक जाणिवेच्या उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्याचा अनोखा आदर्श समोर आला आहे.
आज पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किमती तसेच काही ठिकाणी निर्माण झालेल्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. भर उन्हात पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगेत उभ्या असलेल्या ज्येष्ठ नागरिक, माता-भगिनी, कष्टकरी, शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या हालअपेष्टा लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला.
वाढदिवसानिमित्त कोणताही दिखावा न करता, पंपावर प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना थंड पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेकांना दिलासा मिळाला आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी जपण्याचा संदेशही देण्यात आला.
या वेळी प्रज्वल शहाणे, वसत पठाण, अमित पवार, विवेक काकडे, मोहित काकडे, राज नकवाल, श्रवण जाधव आदी सहकाऱ्यांची उपस्थिती लाभली.











