सिंदखेड राजा (हॅलो बुलडाणा/प्रदीप साळवे) तालुक्यातील राहेरी रेती घाटावर काल रात्री धक्कादायक प्रकार घडला. वार्तांकन करत असताना पत्रकार रामदास कहाळे यांच्यावर रेती माफियांनी निर्दयी मारहाण केली. ही घटना केवळ एका पत्रकारावरचा हल्ला नसून देशाच्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर झालेला थेट आघात असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
या भ्याड हल्ल्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, भीमशक्ती कामगार युनियनचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष अर्जुनराव काकडे यांनी तीव्र निषेध नोंदवत, जोपर्यंत पत्रकार कहाळे यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत भीमशक्ती संघटना त्यांच्या पाठीशी ठाम उभी राहील, असा इशारा दिला आहे.
तसेच आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.










Total Users : 3275566