spot_img
spot_img

गुन्हेगारीवर पोलिसांचा बुलडोझर! चिखलीच्या अंत्रीकोळीत मोठा शस्त्रसाठा जप्त; देशी पिस्टल, काडतुसे आणि XUV500 सह टोळी गजाआड

रायपूर (हॅलो बुलडाणा/ सचिन जयस्वाल) पोलिसांनी चिखली तालुक्यातील अंत्रीकोळी येथे केलेल्या धडक कारवाईत अवैध शस्त्रसाठा उघड करत गुन्हेगारी विश्वात खळबळ उडवली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी थेट आर्म अॅक्टनुसार छापा टाकत मोठा शस्त्रसाठा जप्त केला.

मा. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अमोल गायकवाड तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 18/05/2026 रोजी ही कारवाई पार पडली. पंचासमक्ष करण्यात आलेल्या या धडाकेबाज रेडमध्ये आरोपींच्या ताब्यातून दोन देशी बनावटीच्या पिस्टल, चार मॅगझीन, 92 जिवंत काडतुसे, दोन वापरलेली काडतुसे, एक धारदार लोखंडी चाकू, महिंद्रा XUV500 वाहन तसेच आयफोन 16 प्रो मॅक्स मोबाईल असा एकूण अंदाजे 7 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईत आरोपी 1) शुभम सागर पवार (रा. कारला चौक, वर्धा), 2) रुपेश मिलन शिंदे व 3) रोहेल मिलन शिंदे (रा. हसनाबाद, ता. भोकरदन, जि. जालना, ह.मु. पाचोरा, जि. जळगाव) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अनंत कळमकर यांच्या फिर्यादीवरून रायपूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 92/2026 नोंदवण्यात आला असून भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3, 5, 7, 25 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही संपूर्ण कारवाई रायपूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार निलेश सोळंके, पोहेका दशरथ शितोळे, पोहेका ज्योती गलबले, पोका राहुल जाधव, पोका अनंत कळमकर, पोका अख्तर शेख, पोका लक्ष्मण शिंदे, चालक पोहवा सागर कोरडे तसेच दहशतवाद विरोधी पथक अकोला यांच्या संयुक्त पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

सध्या या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार निलेश सोळंके व पोका लक्ष्मण शिंदे करत असून या कारवाईमुळे अवैध शस्त्र तस्करीच्या जाळ्यावर मोठा झटका बसल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!