देऊळगाव राजा (हॅलो बुलडाणा) तालुक्यात खडकपूर्णा धरण परिसरात सुरू असलेल्या झिंगा उत्पादन प्रकल्पावर मोठा डल्ला टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लोटस सी फूड कंपनीच्या प्रकल्पातून तब्बल 40 किलो झिंगा चोरी करून सुमारे 32 हजार रुपयांचा माल लंपास करण्यात आला.
फिर्यादी राजू मौर्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून अज्ञात व्यक्तींकडून जलाशयात विषारी औषध टाकून झिंग्यांची चोरी केली जात असल्याचा संशय होता. यावर लक्ष ठेवून असताना 7 मे रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास समीर पठाण हा आरोपी मोटारसायकलवरून चोरीचा माल घेऊन जाताना रंगेहात पकडण्यात आला. त्याच्या ताब्यातून 40 किलो झिंगा जप्त करण्यात आला.
या प्रकरणात समीर पठाण व विकास काकड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.










Total Users : 3275674