बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरातून अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. नारायणसेठ मोतीलालजी अग्रवाल यांच्या धर्मपत्नी, मनीष यांच्या मातोश्री तसेच सौ. सरलादेवी भुषणजी अग्रवाल यांच्या देवराणी, अशोक व साईनाथ यांच्या भाभी सौ. इंदुमती नारायण अग्रवाल (वय 73 वर्षे) यांचे आज दिनांक 18 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने अग्रवाल कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी 5 वाजता राहत्या निवासस्थान, राजे संभाजीनगर रोड, बुलढाणा येथून निघून जुनी हिंदू स्मशानभूमी येथे जाणार आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.










