चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) शहरात आज दिवसभर एकाच कुत्र्याने अक्षरशः दहशत माजवली. बाबू लॉज चौक, जयस्तंभ चौक, आठवडी बाजार आणि नगर परिषद परिसरात या भटक्या कुत्र्याने अंदाजे १७ ते १८ नागरिकांना चावा घेतला. यात लहान मुलांसह महिलांचाही समावेश असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
प्रशासन मात्र सुरुवातीला कुठेच दिसून आले नाही. नागरिकांच्या सतर्कतेमुळे रात्री उशिरा या प्रकरणाला गती मिळाली. संतप्त नागरिकांनी नगरसेवक उबेदअली खान (भाईजान) यांच्याशी संपर्क साधताच त्यांनी तात्काळ हालचाल करत नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना पाचारण केले.
हॅलो बुलढाणाचे चिखली तालुका प्रतिनिधी सैय्यद साहील यांनी स्वतः पुढाकार घेत कर्मचाऱ्यांना दुचाकीवर बसवून कुत्र्याचा थरारक पाठलाग केला. अखेर बैलजोडी सिमेंट रोड परिसरात या कुत्र्याला पकडण्यात यश आले











