spot_img
spot_img

जळगाव जामोदमध्ये निबंधकच फसवणुकीच्या जाळ्यात; ‘ब वर्ग’ जमीन ‘अ वर्ग’ दाखवून मोठा डाव उघड

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा) शहरात एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला असून, मालमत्ता नोंदणीची जबाबदारी असलेले अधिकारीच फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकले आहेत. सह दुय्यम निबंधक सुनील पंढरी चव्हाण यांच्यासह एकूण ६ जणांवर गुन्हा दाखल झाल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

फिर्यादी मनीषकुमार भिकमचंद गांधी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शहरातील शिट नंबर १५ सी, प्लॉट नंबर ५६ ही ‘ब वर्ग’ जमीन विक्रीसाठी दाखवण्यात आली. या व्यवहारासाठी शासनाची परवानगी आवश्यक असतानाही आरोपींनी ५ लाख ७० हजार रुपये घेऊन सौदाचिट्ठी केली. मात्र, परवानगी प्रलंबित असतानाच आरोपींनी संगनमत करून थेट कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात सर्वात गंभीर बाब म्हणजे, कॉम्प्युटरद्वारे शासकीय नोंदींमध्ये बदल करून ‘ब वर्ग’ जमिनीचे ‘अ वर्ग’ धारणधिकारात रूपांतर करण्यात आले. एवढेच नव्हे, तर या बेकायदेशीर प्रक्रियेकडे दुर्लक्ष करत सह दुय्यम निबंधक चव्हाण यांनी संबंधित मालमत्तेचे खरेदीखत मो. मुस्ताक उर्फ मुस्ताक भाईजान यांच्या नावे नोंदवून दिल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी अ. हबीब, मो. शरीफ, मो. मुस्ताक, एजाज देशमुख, मो. साबीर आणि सुनील चव्हाण अशा सहा जणांवर भादंवि कलम ४२०, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक नितीन कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल संजय वेरूळकर तपास करत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!