spot_img
spot_img

नागरिकांनी स्व-जनगणना करून सहकार्य करावे’ तहसीलदार – पवन पाटील.

ज.जामोद (हॅलो बुलडाणा/ज्ञानदेव राजनकर) केंद्र शासनाच्या वतीने सुरू असलेल्या जनगणना २०२६ च्या कामासाठी नागरिकांनी ‘स्व-जनगणना’ अर्थात मोबाईल ॲपद्वारे स्वतःची माहिती भरून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जळगाव जामोदचे तहसीलदार पवन पाटील यांनी केले आहे “जनगणना हे देशाच्या विकासाचे मूलभूत साधन आहे. अचूक आकडेवारीवरच शासनाच्या योजना ठरतात. यावेळी शासनाने नागरिकांना घरबसल्या मोबाईलद्वारे माहिती भरता यावी यासाठी *‘Self Enumeration’* सुविधा १ मे ते १५ मे २०२६ पर्यंत उपलब्ध करून दिली आहे. प्रत्येक कुटुंबप्रमुखाने http://www.censusindia.gov.in या संकेतस्थळावर किंवा ‘Census २०२६’ मोबाईल ॲपवर आपल्या कुटुंबाची संपूर्ण माहिती भरावी.”

स्व-जनगणना कशी कराल?
१)Census २०२६ ॲप डाऊनलोड करा किंवा संकेतस्थळाला भेट द्या.
२)मोबाईल नंबरद्वारे नोंदणी करून OTP टाका.
३)कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे, वय, शिक्षण, व्यवसाय आदी माहिती भरा.
४)सबमिट केल्यानंतर मिळालेला *‘Acknowledgement Number’* जपून ठेवा. प्रगणक घरी आल्यावर हा नंबर दाखवा.“ज्यांना मोबाईल हाताळता येत नाही, त्यांनी ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय किंवा सेतू सुविधा केंद्रात जाऊन मदत घ्यावी. शाळा, अंगणवाडी सेविका, तलाठी, ग्रामसेवक यांच्या माध्यमातूनही जनजागृती केली जात आहे,” असेही तहसीलदारांनी स्पष्ट केले.ग्रामीण भागात विशेष लक्ष
तालुक्यातील दुर्गम व आदिवासी भागात नेटवर्कचा प्रश्न असल्याने तेथे प्रगणक प्रत्यक्ष घरोघरी जाऊन माहिती संकलित करणार आहेत. मात्र शहर व लगतच्या गावांतील नागरिकांनी स्व-जनगणनेला प्राधान्य द्यावे, जेणेकरून प्रगणकांवरील ताण कमी होईल व काम लवकर पूर्ण होईल.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!