spot_img
spot_img

‘चूल आणि मूल’पुरती मर्यादा संपली! बचत गटांच्या बळावर घाटबोरीच्या महिला आता आर्थिकदृष्ट्या सक्षम; किशोर आळेकर

मेहकर (हॅलो बुलढाणा) तालुक्यातील घाटबोरी महिला बचत गटांनी ग्रामीण भागातील महिलांच्या आयुष्यात आर्थिक स्वावलंबनाची नवी क्रांती घडवून आणली असून, छोट्या-छोट्या बचतीतून महिलांनी आता उद्योग, व्यवसाय आणि स्वयंरोजगाराच्या दिशेने दमदार पावले टाकली आहेत. बचतीच्या माध्यमातून महिलांच्या हातात आर्थिक बळ आले असून त्यांचा आत्मविश्वासही वाढला आहे, असे प्रतिपादन बँक ऑफ महाराष्ट्रच्या घाटबोरी शाखेचे कॅशिअर किशोर आळेकर यांनी केले.

मेहकर तालुक्यातील घाटबोरी येथील श्री वीरशैव मंदिरात महिला बचत गटांच्या वार्षिक नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच राजकुमार पाखरे, माजी सरपंच गजानन चनेवार, शाखा व्यवस्थापक विशाल तायडे, उपव्यवस्थापक अमोल साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आळेकर म्हणाले की, महिला बचत गट म्हणजे केवळ पैशांची बचत नव्हे, तर महिलांच्या आत्मविश्वासाला, निर्णयक्षमतेला आणि नेतृत्वाला बळ देणारी चळवळ आहे. अनेक महिला आज बचत गटांच्या माध्यमातून लघुउद्योग व व्यवसाय उभारून स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत. ही चळवळ ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही नवी ताकद देत आहे.

बैठकीला पद्मावती अंभोरे, शालिनीताई नवले, ताईबाई अंभोरे, पुनमताई पाखरे, संगिताताई केशेवार, अनुसयाताई कुसळकर, सुनिताताई खिल्लारी, मंगलाताई गवळी यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!