spot_img
spot_img

‘५ लाख आण… फ्लॅट नावावर कर!’ विवाहितेच्या संसारावर पैशांच्या मागणीचा घाला? पतीसह सासरच्या ६ जणांवर बुलढाणा शहर पोलिसांत गुन्हा!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच सुखी संसाराच्या स्वप्नांना हुंड्यासदृश मागण्यांचे ग्रहण लागल्याचा गंभीर प्रकार बुलढाणा शहरात समोर आला आहे. इंदिरा नगर येथील विवाहिता फतिमा हलीमा सादीया ऊर्फ गुडुना यांनी पती आणि सासरच्या मंडळींकडून तब्बल ५ लाख रुपये तसेच देऊळगाव राजा येथील वडिलांच्या मालकीचा एक फ्लॅट नावावर करून देण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे.

भरोसा सेल, बुलढाणा येथे दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतर सुरुवातीचे ३ ते ४ महिने चांगली वागणूक देण्यात आली. मात्र त्यानंतर घरकामावरून टोमणे, शिवीगाळ आणि सतत पैशांसाठी तगादा सुरू झाल्याचा आरोप आहे. मागणी पूर्ण न केल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी पती शाहीन शहा बशीर शहा, सासरे बशीर शहा लुकमान शहा, सासू हलीमाबी बशीर शहा, दीर शेहजाद शहा बशीर शहा तसेच अन्वर शहा लुकमान शहा आणि मुनीर शहा यांच्याविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ दत्तात्रय नागरे करीत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!