spot_img
spot_img

धाड पोलिसांची मोठी कारवाई! संघटित गुन्हेगार टोळी जेरबंद

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यात दरोडे, जबरी चोरी आणि घरफोड्यांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणाऱ्या संघटित गुन्हेगार टोळीवर धाड पोलिसांनी जोरदार कारवाई करत मोठं यश मिळवलं आहे. मर्दडी घाट परिसरात चाकूचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत मुख्य आरोपींसह तिघांना अटक करण्यात आली आहे.

दि. २३ एप्रिल २०२६ रोजी घडलेल्या घटनेत फिर्यादीकडून रोख रक्कम व इतर मुद्देमाल जबरीने हिसकावून नेण्यात आला होता. या प्रकरणी धाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच तपासाला वेग देण्यात आला. तपासादरम्यान ही टोळी बुलढाणा आणि जालना जिल्ह्यात संघटित पद्धतीने गुन्हे करत असल्याचे समोर आले.

पोलीसांनी टोळी प्रमुख राजेंद्र चंडोलसह कृष्णा मुरडकर व गणेश पवार यांना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल १.९७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात तीन दुचाकी आणि महागडे मोबाईल फोनचा समावेश आहे. या टोळीवर आता संघटित गुन्हेगारीचे गंभीर कलमही लावण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे, या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवण्यात आली होती. धाड पोलीसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीला मोठा आळा बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अटक आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!