spot_img
spot_img

जालना हद्दीत सिनेस्टाईल थरार; ३ किमी शेतातून पाठलाग करून ५ दरोडेखोर जेरबंद!

देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/ संतोष जाधव) चिखलीतील राजवाडा परिसरात लुटमार करून फरार झालेल्या पाच दरोडेखोरांना पोलिसांनी अवघ्या २४ तासांत सिनेस्टाईल पाठलाग करत जेरबंद केले. जालना हद्दीकडे पळणाऱ्या आरोपींचा तब्बल ३ किलोमीटर शेतातून धावत पाठलाग करत त्यांना पकडण्यात आले. या धडाकेबाज कारवाईत सुमारे ४.८० लाख रुपयांचा मुद्देमाल १०० टक्के जप्त करण्यात आला आहे.

फिर्यादी चंद्रशेखर स्वामी (रा. नांदेड) यांना रत्न खरेदीच्या बहाण्याने बोलावून आरोपींनी चापटा-बुक्क्यांनी व काठ्यांनी मारहाण करत सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम लुटली होती. घटनेनंतर अंढेरा पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपासाला वेग दिला.

तपासादरम्यान मुख्य आरोपी निलेश भोसले याला साकेगाव येथून अटक करण्यात आली. उर्वरित आरोपी जालना दिशेने पळत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी नाकाबंदी करून शेतातून थरारक पाठलाग केला आणि जॅकीचंद पवार, आदित्य भोसले, राज पवार व भाऊराजा पवार यांना पकडले.

पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई करत गुन्हेगारांना चांगलाच धडा शिकवला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!