बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून पेटलेला वाद आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून शहरात तणाव कमालीचा वाढला आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित या पुस्तकाच्या प्रकाशक प्रशांत आंबी यांना पोलिसांनी अचानक अज्ञातस्थळी स्थानबद्ध केल्याने संतापाची लाट उसळली आहे.
आज गायकवाड यांच्या निवासस्थानासमोर होणाऱ्या जाहीर वाचन आंदोलनात आंबी सहभागी होणार होते. मात्र, ते कोल्हापूरहून बुलढाण्याकडे येत असताना चिखलीत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. त्यामुळे आंदोलन आणखी भडकण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
दरम्यान, सीपीआयचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून हातात पानसरेंचे फोटो आणि पुस्तक घेऊन घोषणाबाजी करत आहेत. दुसरीकडे, आमदार गायकवाड यांनीही आंदोलनस्थळी जाण्याचा इशारा दिल्याने वातावरण अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.










