spot_img
spot_img

सिंदखेडराजाचा अकरावी पास ‘मास्टरमाइंड’! बँकांना ३१ कोटींचा घातक गंडा; जिल्ह्यात खळबळ

सिंदखेड राजा (हॅलो बुलढाणा) केवळ अकरावी पास असलेला रायचंद सखाराम कुरंगळ या व्यक्तीने बँकिंग क्षेत्रालाच हादरवून टाकणारा तब्बल ३१ कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. बनावट कागदपत्रांच्या जोरावर दोन मोठ्या सहकारी बँकांना गंडा घालत त्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवली आहे

पोलिस तपासात धक्कादायक बाब समोर आली असून, आरोपीने जालना मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक आणि पूर्णवादी बँकेला वेअरहाऊसच्या नावाखाली बनावट कागदपत्रे सादर करून कोट्यवधी रुपयांचे कर्ज उचलले. विशेष म्हणजे, एका बँकेचे कर्ज फेडण्यासाठी दुसऱ्या बँकेकडून पुन्हा कर्ज घेऊन तो संपूर्ण आर्थिक साखळीच फसवणुकीच्या जाळ्यात ओढत होता.

१७७ बनावट खातेदारांच्या माध्यमातून सुमारे २३.३३ कोटी तर दुसऱ्या बँकेत ८.१२ कोटींचा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. पोलिसांच्या मते हा आकडा ५० कोटींपर्यंत जाऊ शकतो. या संपूर्ण रॅकेटमध्ये काही एजंट, शेतकरी आणि बँक कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

आरोपी सिंदखेड राजा येथे वास्तव्यास असून भिसीच्या माध्यमातूनही अनेक नागरिकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. तो सतत गाड्या बदलून पोलिसांना चकवा देत असल्याची माहितीही तपासात पुढे आली आहे.

दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेने तपास वेगाने सुरू केला असून आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेली कोट्यवधींची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या प्रकरणामुळे बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून संपूर्ण जिल्ह्यात या “स्कॅम”ची जोरदार चर्चा सुरू आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!