शेगाव (हॅलो बुलडाणा) संतनगरी शेगाव आज अक्षरशः दणाणून गेली! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात थेट श्री संत गजानन महाराजांच्या समाधी दर्शनाने केली आणि संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणाने भारावून गेला. राष्ट्रपतींच्या आगमनाच्या क्षणी टाळकरी-वारकरी यांच्या टाळांच्या गजरात आणि “गण गण गणात बोते” च्या जयघोषात भव्य दिव्य स्वागत करण्यात आले.
राष्ट्रपतींसमवेत महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचीही उपस्थिती होती. मंदिर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. राष्ट्रपतींनी समाधीस्थळी विधिवत पूजा-अर्चा करून संस्थेच्या कार्याची सविस्तर माहिती जाणून घेतली आणि समाधान व्यक्त केले.
विशेष म्हणजे, राष्ट्रीय आरोग्य महाशिबिर 2026 च्या उद्घाटन प्रसंगीही त्यांनी “गण गण गणात बोते” या मंत्राचा उल्लेख करत संत गजानन महाराजांच्या कार्याचा गौरव केला. राष्ट्रपतींच्या या भेटीमुळे शेगावच्या आध्यात्मिक व सामाजिक कार्याला राष्ट्रीय पातळीवर नवी ऊर्जा मिळाल्याची भावना भक्तांमध्ये व्यक्त होत आहे.











Total Users : 3370159