सुलतानपूर (हॅलो बुलडाणा/मोईन खान)
चिखला काकड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा स्थापनेच्या वादातून झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ आज, रविवार दि. २२ फेब्रुवारी रोजी सुलतानपूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण शांतता असून, गावकऱ्यांनी आरोपींच्या अटकेसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
नेमकी घटना काय?
दिनांक २० फेब्रुवारी रोजी चिखला काकड येथे पुतळा स्थापनेदरम्यान दोन गटांत वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन कुमारी संजीवनी वाघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांना गंभीर मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जनमानसात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
प्रशासनाला १२ तासांचा अल्टिमेटम
सुलतानपूर येथे जमलेल्या ग्रामस्थांनी आणि विविध संघटनांच्या नेत्यांनी या घटनेचा जाहीर निषेध केला आहे. यावेळी आंदोलकांनी
जनतेचे उत्स्फूर्त समर्थन आजच्या या बंदला स्थानिक व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या निषेध सभेला दिलीप वाघ साहेब, भगवानराव चेके मामा, शिवप्रसाद जोगदंड, उपसरपंच संघपाल पनाड, रमेश भानपुरे,लालू मुल्लाजी, सूरज साठे यांच्यासह मोठ्या संख्येने प्रतिष्ठित नागरिक आणि तरुण उपस्थित होते.











Total Users : 3363713