spot_img
spot_img

बुलढाण्याच्या कायस्थ कॅटर्सची दणक्यात कामगिरी; जिल्हा परिषदेकडून जाहीर सत्कार!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा जिल्हा परिषद तर्फे आयोजित विभागीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव सन 2026 या भव्य कार्यक्रमात कायस्थ कॅटर्सने आपल्या उत्कृष्ट नियोजन व व्यवस्थापन कौशल्याची जोरदार छाप पाडली. हजारो विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बहुप्रतीक्षित सोहळ्यात भोजन व्यवस्था, स्टेज डेकोरेशन, आसनव्यवस्था आणि इव्हेंट मॅनेजमेंटची संपूर्ण जबाबदारी कायस्थ कॅटर्सने समर्थपणे सांभाळली.

कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल जिल्हा परिषदेचे सीईओ श्री. खरात यांच्या हस्ते कायस्थ कॅटर्सचा विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनीही त्यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. काटेकोर नियोजन, वेळेचे भान आणि दर्जेदार सेवा यामुळे संपूर्ण कार्यक्रम सुरळीत पार पडला.

आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल बुलढाणा जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि आयोजन समितीचे मनःपूर्वक आभार, अशी प्रतिक्रिया कायस्थ कॅटर्सच्या वतीने व्यक्त करण्यात आली.या यशामुळे कायस्थ कॅटर्सची जिल्ह्यातील विश्वासार्ह आणि आघाडीची इव्हेंट व्यवस्थापन संस्था म्हणून ओळख अधिक भक्कम झाली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!