spot_img
spot_img

💥BREAKING “दर्शन बंद”ची अफवा; शेगाव संस्थानचा ठाम इन्कार!

शेगाव (हॅलो बुलडाणा) श्री गजानन महाराज मंदिर येथे २३ ते २६ मार्चदरम्यान महामहिम द्रौपदी मुर्मू यांच्या प्रस्तावित भेटीच्या पार्श्वभूमीवर दर्शन बंद ठेवले जाणार असल्याच्या चर्चांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मात्र या सर्व चर्चा निराधार असून कोणत्याही प्रकारे सर्वसामान्य भक्तांना दर्शनापासून वंचित ठेवण्याचा निर्णय झालेला नाही, असे शेगाव संस्थानने ठामपणे स्पष्ट केले आहे.

“देव कधीही ‘आरक्षित’ नसतात. श्रींचे दरबार सर्व भक्तांसाठी समान आहेत,” असा ठणकावून संदेश संस्थानकडून देण्यात आला. सुरक्षा यंत्रणांच्या प्रोटोकॉलनुसार काही वेळा अल्पकालीन हालचाली किंवा व्यवस्थात्मक बदल आवश्यक ठरू शकतात; मात्र याचा अर्थ दर्शन पूर्णतः बंद असा होत नाही, असेही संस्थानने स्पष्ट केले.

अफवांमुळे भाविकांमध्ये संभ्रम व अनावश्यक नाराजी निर्माण होत असल्याबद्दल संस्थानने खंत व्यक्त केली आहे. कोणतीही अधिकृत माहिती केवळ संस्थानच्या अधिकृत माध्यमांतूनच जाहीर केली जाईल. भाविकांनी अपप्रचाराला बळी न पडता शांतता व संयम राखावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!