spot_img
spot_img

एकटी महिला, रात्रीची वेळ… आणि आरोपीचा संतापजनक प्रकार! हॉटेलमध्ये घुसून गैरवर्तन; डोणगाव हादरले!

मेहकर (हॅलो बुलढाणा/अनिल राठोड) समृद्धी महामार्गालगत डोणगाव शेतशिवारात धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून एका महिलेच्या विनयभंगाची गंभीर घटना घडली आहे. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  एक महिला (हॅलो बुलढाणा सदर महिलेचे  नाव घेत नाही) या समृद्धी महामार्गाजवळ HP पेट्रोल पंपासमोर “हॉटेल महाराष्ट्र” नावाने चहा-पाणी विक्रीचा व्यवसाय करतात. घटनेच्या वेळी त्या हॉटेलवर एकट्याच होत्या.

दरम्यान, लक्ष्मण सोमटकर (वय अंदाजे ३५, रा. डोणगाव) हा हॉटेलमध्ये येऊन दारूची मागणी करू लागला. संबंधित महिलेने दारू विक्री करत नसल्याचे स्पष्ट सांगितल्यावर आरोपीने संतापून तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. त्याने महिलेचा हात धरून तिला जबरदस्तीने जवळ ओढले, अंगाला हात लावला तसेच ब्लाउजला हात घालून विनयभंग केला. झटापटीदरम्यान महिला खाली पडून जखमी झाल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

महिलेच्या आरडाओरडीनंतर आरोपी शिवीगाळ करत घटनास्थळावरून पसार झाला. त्यानंतर पीडितेने पतीसह डोणगाव पोलीस स्टेशन गाठून तोंडी फिर्याद दिली.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४, ११५(२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार संजय घिके यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!